Press "Enter" to skip to content

गाडीची काच फोडुन आतील मौल्यवान  दागीने व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल दि. १४ ( संजय कदम ) : उभ्या गाडीची काच फोडुन आतील मौल्यवान  दागीने व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून  मौल्यवान दागिन्यासह रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन हस्तगत केले आहे .                            

   पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गो ग्रिन हॉटेल, कल्ले गाव या हॉटेलचे पार्कीगमध्ये फिर्यादी यांनी पार्क करुन ठेवलेल्या फॉर्च्यूनर कार चे डाव्या बाजुची पाठीमागील काच फोडुन गाडीतील पर्सची व पर्समधील एकूण ८,४८,५००/- रु.. किमतीचे दागीने व रोख रक्कम चोरी केली असून सदर बाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याबाबत  पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त  संजय येनपुरे,  पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, पनवेल  प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांनी अधिक शोध घेण्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक  अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा भुषण म्हारसे, पोशि आकाश भगत याना मार्गदर्शन केले.

त्यानुसार  सदर गुन्हयाचा करण्यात आलेला तांत्रीक तपास व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल व पोहवा  शिवाजी बाबर यांचे पथकाने इंडी, जि. विजापूर, कर्नाटक येथे जावून सापळा रचून सदर गुन्हा करणारे आरोपीत नामे शेरा सुरेश चव्हाण, वय ४१ वर्षे, रा. शिरढोण, म्हाडा, बी-४, रुम क्र. १०३, पहिला माळा, खोणी पलावा, मानपाडा, डोंबिवली.. जि. ठाणे मु.रा. नवपुरा गाव, पो. बोगना, मर्दा थाना, जि. काझीपुर, उत्तरप्रदेश व विनोद उर्फ लंगडा अशोक पवार, वय ४३ वर्षे, रा. अंबुजवाडी, लक्ष्मी चाळ, मालवणी, मालाड, मुंबई मुळ रा. आंजुर्गी, ता. जि. विजापूर, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. 

सदर दोन्ही आरोपीत यांना मा. न्यायालयाने दि. १६/०४/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असून पोलीस कोठडी दरम्यान आरोपीतांकडे केलेल्या तपासादरम्यान त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेले तोळे सोने व लेडीज पर्स असा एकूण १८३,५००/- किमतीचा ऐवज व आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली रु. ७०,०००/- किमतीची यामाहा एफझेड मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीतांकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करण्यात येत आहे.

सदर दोन्ही अटक आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात खालील नमुद तक्त्याप्रमाणे गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने  आरोपी शेरा सुरेश चव्हाण यांचेविरुध्द  मुरबाड पोलीस ठाणे ,निगडी पोलीस ठाणे ,वर्सोवा पोलीस ठाणे ,कोपरखैरणे पोलीस ठाणे , खारघर पोलीस ठाणे ,नवघर पोलीस ठाणे ,सीबीडी बेलापुर पोलीस ठाणे ,पनवेल शहर पोलीस ठाणे, रबाळे पोलीस ठाणे , एनआरआय सागरी पोलीस ठाणे ,तळोजा पोलीस ठाणे ,खांदेश्वर पोलीस ठाणे ,नेरुळ पोलीस ठाणे ,मनोर (पालघर) पोलीस ठाणे , दादर (मुंबई) पोलीस ठाणे ,बोईसर (पालघर) पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत तर  आरोपी विनोद उर्फ लंगडा अशोक पवार यांचेविरुध्द निगडी (पिंपरी चिंचवड) पोलीस, गावदेवी पोलीस ठाणे,मालवणी पोलीस ठाणे ,चारकोप पोलीस ठाणे ,बोरीवली पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.