Press "Enter" to skip to content

भाजपा कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.

भाजपचे राज्य परिषद सदस्य व ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंझारराव, नगरसेवक अजय बहिरा, रुपेश नागवेकर, हेमंत माने, सचिन दिसले, अशोक आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व घटनात्मक योगदानाची आठवण करून दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांच्या समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी बाबासाहेबांचा जयजयकार जयघोष करण्यात आला. 

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.