
पनवेल दि.१३ (वार्ताहर) : रा. स्व. संघाच्या शताब्दि वर्षानिमित्त पनवेल मधील बल्लाळेश्वर वस्ती व लाईन आळी वस्तितील सकल हिंदू संमेलन जेष्ठ नागरिक संघ हाॅल मध्ये पार पडले.अनेक सज्जन शक्तिंच्या एकत्रित संयोजन समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक हिंदू संघटना, सामाजिक संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा कार्यक्रम उत्तम झाला. संघशाखेच्या शिस्तबद्ध नियोजनातून परिवाराच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करून पनवेलच्या संस्कृतीमध्ये मानाचा तुरा खोवला.
सुरवातीलाच स्वरसम्राज्ञी आशाताईंना श्रद्धांजली वाहून कार्यक्रम वेळेत चालू झाला. आलेल्या नागरिकांची नोंदणी QR code च्या माध्यमातून सुटसुटीत व कालानुरूप पद्धती मुळे सुरवातीचा गोंधळ गडबड व कार्यकर्त्यांच्या गडबडी शिवाय संपन्न झाला. परंपरे नुसार दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन होऊन वक्ते व्यासपीठावर स्थानापन्न झाले .त्यांच्या झालेल्या स्वागता नंतर अध्यक्ष नंदकुमार कर्वे यांनी अतीशय थोडक्यात संमेलनाचा उद्देश सांगितला . सुरवातीलाच आयुष पवार आणि ओम राजे या दोन तरुणांनी गायलेले पोवाडे उन्हातून आलेल्या श्रोतृ वर्गात जोश निर्माण करून गेला.
रायगड भूषण किर्तनकार, पत्रकार व अनेक पुरस्कार मिळवलेले श्रीराम पुरोहित यांनी आता पर्यंत मिळालेल्या पुरस्कारांना साजेसे असे उद्बोधन करून हिंदू धर्मातील पुढील काळात येणाऱ्या संकटांची जाणीव करून देत संमेलनाचे महत्त्व हिंदू मुस्लिम यांच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास समोर ठेवून कर्जत तालुक्यातील ख्रि चॅनिटी बाबत लोकांच्या डोळ्यात अंजन घातले. त्यानंतर कुमारी पेंडसे हिने सादर केलेला अभंग लोकांना खूपच आवडला. सौ. सुनिता खरे यांचे पंच परिवर्तनातून समाज बदलाचे व त्यात असलेली नारी शक्ती चे महत्व पुरुष वर्गात दाद मिळवून गेले. व नारी शक्तीला कार्यक्रम शेवट पर्यंत ऐकण्याची गोळी देवून गेला. त्यानंतर चे सध्याच्या परिस्थिती विषद करणारे अतिशय अतिशय समर्पक भारूड मनाला भावले. साथ संगत ही उत्तम होती.त्यानंतर रा. स्व.संघ माननीय रायगड विभाग संघचालक रघुजीराजे आंग्रे यांचे उद्बोधन व संमेलना मागील व्यवहार्यता मनाला चटका लावून गेली.आत्ताच्या काळातही अंतर्गत शक्तिंकडून असलेला धोका, व त्यामुळे संमेलनांची खऱ्या अर्थाने असणारी आवश्यकता लोकांत हिंदू शक्ती चा जागर करून गेला.
कार्यक्रमाचा शेवट कलाश्रुत या भरतनाट्यम् च्या शिष्यांनी संपूर्ण वंदेमातरम् नाट्यविष्कार सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मेघना कदम या वनवासी कल्याण आश्रमात तयार झालेल्या निवेदिकेने लाघवी शब्दात केलेले निवेदन व वेळात कार्यक्रम पारपाडण्याची धडपड दाद मिळवून गेली. अनेक जेष्ठ कार्यकत्यां बरोबर तरुण कार्यकर्ते ही अतीशय झोकून देऊन काम करत होते. प्रवेशव्दारावरील भव्य भारतमाता, सुबक रांगोळ्या आकर्षक व्यासपीठ सजावट, सौ अनया करंदीकर\ सौ रोहिणी टिळक यांनी स्टेज व्यवस्थापन समर्थपणे पेलले, चंद्रकांत मने यांनी पोस्टर बॅनर इ छपाईची कामे आदिती जोशी यांच्या सहकार्याने छान केली.
चंदनाचा टीळा,आणि सौ सुनिता खरे यांचे सांस्कृतिक कार्यकमांचे नियोजन यांमुळे वातावरण निर्मिती फार सुंदर झाली. या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, व नगरसेवक, किर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ व्यक्ति या साऱ्यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय. जसे नियोजन तसाच कार्यक्रम, कसलाही गोंधळ नाही ही गोष्ट प्रेक्षकांच्या चेहर्यावर आनंद दाखवीत होती. या कार्यक्रमास अनेक धनिक, भाविक, प्रतिष्ठीत लोकांनी दिलेल्या सद्भाव देणगीतून हा कार्यक्रम यशस्वि झाला. अनेक कार्यकर्त्यांची अपार मेहनत यशस्वितेचे गमक ठरली.
वार्ताहरांनी आठवणीने या कार्यक्रमाची नोंद घेत, व्हिडीओ शुटींग, फोटोग्राफी व वृत्तसंकलन केले. एकंदरीत कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळे कार्यक्रम अतिशय स्मरणीय झाला .





Be First to Comment