Press "Enter" to skip to content

आदिवासी शेतकऱ्याच्या अज्ञान पणाचा फायदा घेत जमिनीची फसवणूक

पेण, ता. १३ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील आदिवासी समाजातील शेतकऱ्याच्या अज्ञान पणाचा फायदा घेत त्याच्या जमिनीची फसवणूक केली असल्याची तक्रार शंकर राजू मोरे ऊर्फ शंकर गणपत हिलम वय वर्ष ५२ राहणार कंजरघर सुधागड यांनी पेण पोलीस ठाण्यात केली आहे.याबाबत माहिती अशी की शंकर मोरे ऊर्फ शंकर हिलम यांची पेण तालुक्यात गौळणवाडी येथील जुना सर्व्हे नंबर ७/६५ व नवीन सर्व्हे नंबर १/६५ क्षेत्र १०१ गुंठे असणाऱ्या जमिनीचा सन २०२४ मध्ये पीकविमा आणि शेतकरी कर्ज काढण्यासाठी सातबारा उता-याची गरज असल्याने तो उतारा काढण्यासाठी तलाठी सजा कामार्ली येथे गेलो असता सदर जागा ही रफिक नजीर तडवी यांना विकली असल्याचे समजले याबाबत मी त्याला विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.तर माझ्याशी संपर्क साधून माझ्या अज्ञातपणाचा फायदा घेत

खरेदीखतात काही रक्कम देण्याचा खोटा उल्लेख करून आदिवासी शेतकरी शंकर हीलम याची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी पेण पोलीस ठाण्यात केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने पाहिले असता तक्रारीतील आरोपी यांने आदिवासी व्यक्तीची फसवणूक केली असल्याचे दिसून येत असल्याने रफिक तडवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.