Press "Enter" to skip to content

कोलाड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन


खांब,दि.१२(नंदकुमार मरवडे)
कोलाड विभाग बौद्ध समाज व बहुजन समाज आणि श्री. प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती एका वेगळ्या आणि भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

यावेळी डॉ.बाबासाहेबांचे वंशज अमनदादा आनंदराज आंबेडकर,ना.अदितीताई तटकरे, ना.भरतशेठ गोगावले, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, जि.प.अध्यक्ष मंगेश वाकडीकर,उद्योजक प्रमोद शेठ म्हसकर तसेच अनेक रिळ स्टार, वकील, समाजसेवक आदींसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

प्रथमच कोलाड विभागाच्या वतीने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर व भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होत असलेल्या या जयंती सोहळ्याप्रसंगी मानवता व सेवा सकाळ सत्र अंतर्गत सकाळी ७ वा.निळ्या निशाणाची शान,भव्य ध्वजारोहण सोहळा,७:३० वा. मंगलमयी सुरूवात सामुदायिक बुद्धवंदना व धम्मदेसना (बुद़्पूजा),८:३० वा.रक्ताचे नाते रक्ताने जपू या, या अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर,११ वा.निसर्गवंदना (वृक्षारोपण),तर सन्मान व प्रबोधन दुपार सत्र अंतर्गत सायं.४ वा.स्वाभिमानी गर्जना कोलाड ब्रीज पासून आंबेवाडी पर्यंत भव्य रॅली,सायं.७ वा.लढा संघर्षाचा बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित विशेष लघुपटाचे प्रेक्षपण, युवा नेतृत्वांचे प्रबोधनात्मक व्याख्यान,ऋण मातृत्वाचे १३५ वी जयंती उद्दिष्टे माता रमाईच्या त्यागाची पावती म्हणून १३५ माता भगिनींना १३५ सन्मानपत्र व साड्यांचे वाटप,७:३० वा.अभिवादन सभा व कर्तृत्वाचा गौरव अंतर्गत समाजासाठी झटणारे,समतेचा संदेश‌ देणा-या २५ ध्येयवेडे वकिल, युवा रिल्स स्टार व शिक्षक तसेच समाजसेवकांचा विशेष सन्मान तर रात्रौ.९ वा.अन्नदान आदी कार्यक्रम संपन्न करण्यात येणार आहेत.तर या भव्यदिव्य जयंती सोहळ्यानिमित्त ‘माता रमाई सन्मान’ साडी वाटप, रक्तदान, ‘वृक्षारोपण, लघुपट चित्रपट, विशिष्ट समाजसेवकांचा सन्मान आणि विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम अशा सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमांनी हा सोहळा सजणार असल्याची माहिती जनसेवक तथा कोलाड विभाग भीमजयंती उत्सव समितीचे संदेश गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.