
पोक्सो आणि पिटा कलमनव्ये नवरा बायकोला 20 वर्ष सश्रम करावास.. पोक्सो वं पिटा अंतर्गत पती पत्नीला एकाच गुन्ह्यात शिक्षेची ऐतिहासिक घटना
पनवेल दि. ११ (वार्ताहर) : आश्रित म्हणून राहणार्या चिमुकली आणि तिच्या मोठ्या बहिणी कडून वेश्या व्यवसाय करवून घेत त्यातून गुजराण करणार्या नवरा बायकोला 20 वर्ष सश्रम कारावासा आणि 33 हजार रुपयांचा दंड आणि दंड नं भरल्यास 6 महिने सश्रम कारावास हि शिक्षा न्यायाल्याने ठोठावली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नवरा बायकोला अशी शिक्षा झाल्याचे पहिलेच उदाहरणं असल्याचे बोलले जात आहे.
2019 मध्ये रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली होती. त्या पीडित मुलींनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. त्यानुसार त्या दोघी बहिणी असून त्यातील एक अल्पवयीन होती. त्याच्या आई वडिलांचे निधन झाल्या नंतर त्या त्यांचे नातेवाईक असणार्या राजेश सोनाजी शिंदे ( वय 42 ) आणि त्याची पत्नी शुभांगी सोनाजी शिंदे ( वय 37 वर्षे ) यांच्या कडे राहत होत्या. दोघींचे शिकण्याचे वय असताना शिंदे दांपत्याने त्यांना वेश्या व्यवसायाला जुम्पले होते. दुर्दैवाने अल्पवायीन मुली कडूनही हे कृत्य करवून घेतले जात होते.
ही गंभीर बाब समोर आल्यावर पोलिसांनी शिंदे दांपत्या विरोधात भारतीय दंड कलम 370 लैंगिक शोषण तसेच बाल लैंगिक अत्याचार कलम 4,6, 17, वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे (पिटा ) कलमनव्ये गुन्हा नोंद केला होता.या प्रकरणी दोघांना अटक करून राजेश शिंदे याला तळोजा कारागृह तर शुभांगी शिंदे हिला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते.या गुन्ह्याचा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (क्रमांक 2) बेलापूर येथे न्यायाधीश मांडवगडे यांच्या कडे सुरु होता. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून शशिकांत इघारे यांनी काम पाहिले.
शुक्रवारी या खटल्याचा अंतिम निकाल लागला. आरोपी राजेश शिंदे आणि शुभांगी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले. न्यायाल्याने नवरा बायकोला 20 वर्ष सश्रम कारावासा आणि 33 हजार रुपयांचा दंड आणि दंड नं भरल्यास 6 महिने सश्रम कारावास हि शिक्षा न्यायाल्याने ठोठावली आहे.
हा खटला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक कल्पना जाधव. यांनी पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घोडके यांनी काम पाहिले. गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक
राजेश गज्जल आणि किरण पाटील होते. न्यायालय अंमलदार संजय कांबळे होते.


Be First to Comment