
विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे नागरिकांसाठी यांनी कार्यालयाबाहेर लावली तक्रारपेटी
पनवेल दि. ११ (वार्ताहर) : पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे नागरिकांसाठी यांनी कार्यालयाबाहेर तक्रारपेटी लावली आहे. या तक्रारींचा वैयक्तिकरीत्या पाठपूरावा करून सर्वांच्या तक्रारी सोडवेन, अशी माहिती म्हात्रे यांनी या वेळी दिली.
पालिका क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला होता. या वेळी नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. समस्या सोडवणार असलो तरी तक्रारदारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. पनवेल शहरातील कोणताही समरिक आपली लेखी तकार टाकू शकणार आहे. रस्ते, पाणी, कचरा, मालमताकर, बांधकाम परवानगी किंवा कर्मचा-यांच्या वैयक्तिक अडचणी जहा कोणत्याही विषयाची तक्रार स्वीकारली जाणार आहे. दर आठवड्याला विरोधी पक्षनेते कार्यालयातील कर्मचारी ही पेटी उघडतील, आलेल्या सर्व तक्रारींची नौद करून त्याचा आढावा घेतला जाईल तर गंभीर आणि तातडीच्या तक्रारी सेट महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागप्रमुखांकडे लेखी स्वरूपात पाठवल्या आणार आहेत.
महापालिका प्रशासनापर्यंत सर्वसामान्य नागरिकांचा आवाज पोहोचत नाही. – अनेकदा लोकांच्या तक्रारी दाबल्या आतात. ही पेटी त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ असेल. विशेष म्हणजे सतरथारी पक्षाच्या पदाधिका-यांना आपल्या नेत्यांच्या भीतीपोटी कोणतीही काय करता येत नाही. या सर्व समस्या मोहविष्यासाठी पाठपुरावा करेन.
– अरविंद म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका



Be First to Comment