Press "Enter" to skip to content

घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात


पनवेल, दि. १० ( संजय कदम ) : पनवेल शहरातील तक्का तसेच करंजाडे परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगाराना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल व रोख रक्कम हस्तगत केली आहे .

शहरातील तक्का परिसरात आरोपी ललित शाही ( वय ३३ ) , किशोर शाही ( वय २९ ) व शेरबहादूर शाही ( वय ३५ ) यांनी आपसात संगनमत करून जवळपास ६०,८८,०००/- रु किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, घड्याळ घरफोडी करून चोरून नेले होते . तश्याच प्रकारे करंजाडे येथे सुद्धा घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता . याबाबत तक्रार दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे , पोहवा परेश म्हात्रे , गंथडे , वायकर , दिवेकर , पोना सम्राट डाकी ,विनोद देशमुख आदींच्या पथकाने आरोपीना ताब्यात घेऊन यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हस्तगत केला आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.