
पनवेल(प्रतिनिधी) पत्रकारितेसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रायगड प्रेस क्लब या संघटनेचा २१ वा वर्धापन दिन तसेच पनवेल महानगर प्रेस क्लबचा प्रथम वर्धापन दिन निमित्त पत्रकारिता, सामाजिकसेवा विशेष सन्मान सोहळा पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पनवेल येथील पत्रकार हरेश साठे यांचा रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन पाटील, झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगारनेते महेंद्र घरत, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रथमेश सोमण, मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह रायगड प्रेस क्लब तसेच पनवेल महानगर प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि शेकडो पत्रकार, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


Be First to Comment