
वनविभाग माणगाव ने खैर माफियाचा केला फार्दाफश !
रोहा : समीर बामुगडे
माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर खैर सोलिव लाकुड वाहतूक करत असताना बुधवार सायंकाळी 8.19 वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.यात टाटा 1916 टेम्पो क्रमांक DD.01.AC.9590 आणि खैर सोलिव माल 11.400घ.मी.किंमत 69309/- रुपये व वाहन अंदाजे किंमत 1800000/- रुपये एकूण 1869309/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नदीम अहमद रा.वापी वलसाड राज्य गुजरात चालक यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की मा. उपवसंरक्षक रोहा व सहाय्यक वनंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यांच्या आदेशान्वये वनपाल इंदापूर व वनरक्षक कुशेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून बुधवारी सायंकाळी 8.19 वा. टाटा 1916 टेम्पो क्रमांक DD.01.AC.9590 मौजे विघवली मुंबई गोवा महामार्गावर थांबवून तपासले असता त्यामधे खैर सोलिव लाकडे विनापरवाना आढळून आली संबंधित वाहनावर वनविभागाच्या पथकाने कारवाई करत वनक्षेत्रपाल माणगाव यांचे कार्यालय येथे वाहन मालासह जप्त करून आणली.
ही कारवाई मा. उपवसंरक्षक रोहा डॉक्टर शैलेंद्रकुमार जाधव व साहाय्यक वनसंरक्षक रोहा पांढरकामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल माणगाव प्रशांत शिंदे यांच्या आदेशान्वये, वनपाल इंदापूर सुजित राजमाने,वनरक्षक कुशेडे अजिंक्य कदम, वनमजूर विठ्ठल दिघे इत्यादी टीम ने रात्र गस्त करत असताना कारवाई केली.पुढील तपास वनक्षेत्रपाल माणगाव करत आहेत.


Be First to Comment