Press "Enter" to skip to content

अपंग व्यक्तींना तात्काळ अनुदान द्या शिवसेना ठाकरे गटाची मागणी

पेण, ता. ६ (वार्ताहर) : पेण शहरातील अपंग व्यक्तींनी अनुदानाचे फार्म भरूनही गेल्या सहा महिन्यापासून नगरपालिकेने त्यांना अनुदान दिले नसल्याने त्यांना आठ दिवसांत अनुदान देण्यात यावे अन्यथा शिवसेना ठाकरे युवासेना गट आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून अपंग व्यक्तींना मिळणारा अनुदान मागील सहा महिन्यांपासून मिळाला नसून यावर्षीचा मार्च महिना सुद्धा उलटून गेला आहे तरीही सदरच्या अनुदानासाठी अपंग व्यक्तींना अजून पर्यंत किती वाट पाहावी लागेल अनुदान न मिळाल्याने त्यांचा
कुटुंबावर आर्थिक संकट येत असल्याने ज्यांचे अनुदान रखडले आहेत त्यांना तात्काळ देण्यात यावे अन्यथा याकरिता शिवसेना युवासेना आंदोलन करेल असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेला दिला आहे.
तर शहरातील ज्या ज्या अपंग व्यक्तींनी अनुदानाचे फार्म भरले आहेत त्या सर्वांना अनुदानाचे पैसे लवकरच वाटप होणार असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.यावेळी पेण तालुका युवा सेना अधिकारी योगेश पाटीलसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.