
पनवेल , दि . ०४ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथील राहत्या घरातून एक विवाहित महिला आपल्या तीन वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याने ते दोघे हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
रितीका अजय गायकर, (वय २७ वर्षे) अंगाने सडपातळ, रंग गोरा, डोळे काळे, उंची ४ फुट ३ इंच, नाक बसके, उजव्या गालावर काळ्या रंगाची मोठी जन्मखुण, अंगात नेसुन काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, भाषा मराठी-इंग्रजी-हिंदी बोलते. सोबत मुलगा रूषभ वय ३ वर्षे यास घेवुन गेली आहे. या दोघांबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यानी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस नाईक प्रदीप पोपेटे यांच्याशी संपर्क साधावा .



Be First to Comment