Press "Enter" to skip to content

हभप डॉ.हरिदास पालवे शास्त्री यांनी जिंकली भाविकांची मने

बाहे येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा
: ग्रामस्थांसह तरूणवर्ग व महिला वर्गाचा उत्स्फूर्तपणे सहभाग

खांब-रोहा,दि.३(नंदकुमार मरवडे)

रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावामध्ये सालाबादप्रमाणे या ही वर्षी दि.१ आणि २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

रायगड भूषण हभप डॉ.मारूती महाराज कोलाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ता.१ एप्रिल रोजी सायं.हरिपाठ,सायं.७ ते ९ हभप डॉ.हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदी यांची हरिकिर्तनरूपी सेवा तद्नंतर महाप्रसाद व रात्रौ.११ वा.भव्य काठी मिरवणूक सोहळा तर दि.२ एप्रिल रोजी सकाळी ७ वा.श्री.हनुमान जन्म सोहळा व अभिषेक, सकाळी १० वा.श्री.सत्यनारायणाचु महापूजा,दु.१ वा.पालखी सोहळा व रात्रौ. ९ वा.महाप्रसाद आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.या संपुर्ण सोहळ्याचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ बाहे तसेच तरूण मंडळ बाहे अधिक मोलाचे सहकार्य केले.

हिंदू हा धर्म नाही,तर ती एक जीवन प्रणाली आहे.भारतासारखे राष्ट्र संपुर्ण जगामध्ये नाही.तर मातृभाषा हे आपले वैभवाचा ठेवा असून तो ठेवा आपण जतन करून ठेवला पाहिजे.
——

सुप्रसिद्ध किर्तनकार व समाजप्रबोधनकार
हभप डॉ.हरिदास महाराज पालवे शास्त्री
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.