सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन 40 मिनीटंही झाली नाही तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच दोन क्रिकेटरने एकाच दिवशी 40 मिनीटांच्या गॅपने निवृत्तीची घोषणा केली असावी.
“माही, तुझ्यासोबत खेळने हा एक चांगला प्रवास होता. अतिशय़ अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे,” अशी पोस्ट रैनाने केली आहे.
सुरेश रैना भारताकडून 18 कसोटी, 226 वनडे व 78 टी 20 सामने खेळला असून 2011 विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता.
रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 17 जुलै 2018 रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला असून तो भारतीय संघात कमबॅकसाठी प्रयत्न करत होता. तो आयपीएल मात्र खेळत राहणार आहे.






Be First to Comment