Press "Enter" to skip to content

एसआयआर अभियानाच्या पनवेल विधानसभा प्रमुखपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती

पनवेल (प्रतिनिधी) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १८८ – पनवेल विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक परेश ठाकूर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही परेश ठाकूर यांचे अभिनंदन होत आहे. 

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.