
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तयारीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरुष व महिला कबड्डी संघाच्या सराव शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, संघ व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे, सुनील पाटील, विनोद नाईक, विश्वनाथ पाटील, संकेत म्हात्रे, मंदार मुंबईकर, विपुल मोकल, पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. दिनांक २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाची सक्षम तयारी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सराव शिबीर दररोज सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत क्रीडांगणावर होत असून दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी पुरुष व महिला कबड्डी संघ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेसाठी सिन्नर, नाशिक येथे रवाना होणार आहेत.




Be First to Comment