Press "Enter" to skip to content

वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या शैक्षणिक सुविधा

कळंबोलीत आधुनिक शैक्षणिक संकुल उभारा; नगरसेवक रामदास शेवाळे यांची महापौरांकडे मागणी

पनवेल दि.२८(वार्ताहर): कळंबोली सेक्टर-२०, भूखंड क्र. १८ येथील राखीव जागेवर अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्याबाबत कळंबोलीचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यादके मागणीचे निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये शेवाळे यांनी या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या शैक्षणिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे येथील राखीव भूखंडाचा योग्य वापर करून आधुनिक सुविधा असलेले शैक्षणिक संकुल उभारणे गरजेचे असल्याचे शेवाळे यांनी या निवेदनात नमूद केले आहे. या संकुलामध्ये डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडा सुविधा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे सभापती बबन मुकादम, सहकारी महेश गोडसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.