
पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण शहरात राहणारा वसीम शेख अन्सारी वय (वर्ष २०) हा भोगावती नदीपात्रातील पिंपळडोह येथे आपल्या मित्रांसोबत हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेल्याने त्यांनी पाण्यात उडी घेतली असता त्याचा तीथेच बुडून मृत्यू झाला.
याबाबत पोलीस शोध घेत असता दुसऱ्या दिवशी त्याची बॉडी मिळाली आहे.याबाबत माहिती अशी की शहरालगत असणाऱ्या भोगावती नदीपात्रातील पिंपळडोह येथे दि.२६ मार्च २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वसीम शेख अन्सारी हा तरुण आपल्या मित्रांबरोबर हॉलीबॉल खेळत होता खेळताना सदरचा बॉल पाण्यात गेल्याने त्यांनी बॉल कढण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समजले असता तात्काळ त्या ठिकाणी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या टीमने पेण अग्निशामक दलाच्या माध्यमातून भोगावती नदीपत्रात शोध कार्य सुरू ठेवले परंतु रात्रीच्या अंधारात शोध कार्याला बाधा येत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी हेल्प फाउंडेशन खोपोली व कोलाड येथील दोन टीम तसेच पेण अग्निशामक दलाच्या जवानांनी दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता शोध कार्यास सुरुवात केली असता जवळपास चार तासानंतर वसीम अन्सारी याची बॉडी मिळाली.
सद्या उन्हाचे दिवस असल्याने अनेक तरुण मुले, मुली, नागरीक आपल्या घरातील कुटुंब व्यक्तींना न सांगता आंघोळीसाठी किंवा खेळण्यासाठी नदीपात्रात, तळावा जवळ जात असतात मात्र अनेकदा पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडतात त्यामुळे सदरची घटना घडू नये याकरिता पालकांनी जागृत राहणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात येत आहे.
संदीप बागुल- पेण पोलिस निरीक्षक



Be First to Comment