Press "Enter" to skip to content

डॉ.राणी जाधव यांनी फॉरेस्ट्री विषयातून मिळविली पीएचडी


खांब,दि.२६(नंदकुमार मरवडे)

काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षण संस्था किल्ला-रोहा येथे सहा.प्राध्यापिका म्हणून सेवेत असणाऱ्या डॉ.राणी जाधव यांनी फॉरेस्ट्री या विषयातून पीएचडी मिळवली आहे.

डॉ.राणी जाधव या काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षण संस्था किल्ला-रोहा येथे २०१७ पासून सेवेत रूजू झाल्या आहेत.त्यांनी २०११ साली डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे वनशास्र या विषयात बीएस्सी पुर्ण केले.पुढे २०१४ सालात त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ हार्टिकल्चर अॅंण्ड फॉरेस्ट्री सोलन हिमाचल प्रदेश येथे एमएस्सी पर्यन्तचे शिक्षण पुर्ण केले.तर आता २०२६ या चालू वर्षात फॉरेस्ट प्रोड्यूस् अॅण्ड युटिलायझेशन (फॉरेस्ट्री) या विषयातून नवसारी अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी नवसारी गुजरात येथून पीएचडी मिळवली आहे.

आयुष्यात शैक्षणिक बाबतीत खुप मेहनत घेण्याची तयारी व सतत नवीन काही तरी शिकावे या उद्देशाने व आपल्यातील आत्मविश्वासाच्या बळावर डॉ.राणी जाधव यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे.त्यांना मिळालेल्या सुयशाबद्दल काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षण संस्था किल्ला-रोहा येथील
सर्व प्रोफेसर व प्राध्यापक वर्ग तसेच सर्व स्टाफ तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.