
पेणमध्ये ‘सेलिब्रेशन रिसॉर्ट’वर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायाचा भांडाफोड
पेण (प्रतिनिधी) : पेण तालुक्यातील बोरगाव येथील ‘सेलिब्रेशन रिसॉर्ट’मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर पेण पोलिसांनी धाडसी कारवाई करत मोठा भांडाफोड केला आहे त्यांनी नियोजनबद्ध सापळा रचत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत बोरगाव येथील ‘सेलिब्रेशन रिसॉर्ट’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.या कारवाईसाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.२३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता पोलिसांनी दोन बनावट ग्राहकांना रिसॉर्टमध्ये पाठवून सापळा रचला असता येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.
या छाप्यात झुल्फिकार जलाल उद्दीन (३०, पनवेल), खगेंद्र केम्बूमलिक (४३), देवेंद्र धर्मा पाटील (३६, पेण) आणि रविंद्र खेत्रमोहन मलिक (३२, अलिबाग) या चौघांना अटक करण्यात आली आरोपींनी संगनमताने महिलांना आणून आर्थिक फायद्यासाठी रिसॉर्टमध्ये वेश्याव्यवसाय चालविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी या कारवाईत २९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलमे १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलमे ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी गोवंडी, मुंबई येथून आणलेल्या तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना आवश्यक ती मदत व संरक्षण देण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत व त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Be First to Comment