Press "Enter" to skip to content

रामचंद्र म्हात्रे विद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा

टाकाऊतून टिकाऊ म्हणजे वेस्टमधून बेस्ट या संकल्पनेतुन चिमणी घरटे बनविण्याची कार्यशाळा


20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो या चिऊताईला वाचविण्यासाठी शाळेतील विदयार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊ म्हणजे वेस्टमधून बेस्ट या संकल्पनेतुन चिमणी घरटे बनविण्याची कार्यशाळा फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) संस्थेच्या वतीने आयोजित केली होती.

प्रत्येक सजीव पर्यावरण संतुलनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु माणसाच्या हव्यासापोटी भूतालावरील वन्य जीव हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे अन्नसाखळ्या बाधित होत आहेत .त्याच अन्नसाखळीतील एक जीव म्हणजे चिमणी वाढते काँक्रीटीकरण, मोबाईल टॉवर्स, वृक्षतोड, कीटकनाशकांचा अमर्याद वापर या सर्वांमुळे चिमण्यांच्या संख्येत कमालीची घट झाली. या चिऊताईला वाचविण्याचा संदेश चिमणी दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.

संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष श्री.जयवंत ठाकूर सर आणि त्यांचे सहकारी श्री.दिनेश चिरनेरकर यांनी रामचंद्र म्हात्रे विद्यालय,आवरे येथे जागतिक चिमणी दिवस हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वन्यजीवांच महत्व पटवून दिलं. आणि विद्यार्थ्यांना घरटे बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थ्यांनी शंभर घरटी तयार केली आणि आपल्या परिसरात लावण्यासाठी विद्यार्थी घेऊन गेले
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाष ठाकूर , उरण पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका प्रीती जाधव मॅडम, निवास गावंड, देवेश म्हात्रे उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गावंड यांनी केले व आभार प्रदर्शन शेखर म्हात्रे यांनी केले .

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.