
पनवेल दि. २० (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षांपासून सखी मंगळागौर पनवेल च्या माध्यमातून विविध उपक्रमात सहभाग घेऊन ते आपल्या कार्याचा ठसा उमटवत असतात व भरघोष बक्षीस जिंकत असतात. अश्याच प्रकारे नवीन पनवेल येथे आयोजित नगरसेवक व एडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या निघालेल्या पाडव्याच्या शोभायात्रेत सुद्धा सतत 9 व्या वर्षी सखी मंगळागौर पनवेल यांनी सहभाग घेऊन आपला ठसा उमटवला.
यावेळी त्या सदस्यांनी सदस्यांनी वेगवेगळी थिम सादर करून नवीन पनवेलकरांची मने जिंकली. यापूर्वी सुद्धा त्यांनी सैनिक, औषधी वनस्पती, कोळी बांधवाच राहणीमान, खाद्य, वेशभुषा, व्यवसाय, वारकरी, कोकणातले खेळे, साडेतिन शक्तीपिठ असे विविध थिम सादर केली आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसे पात्र केली आहेत.




Be First to Comment