Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना लहान मुलांवर झेंडे विकण्याची वेळ


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

आज देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन कोरोना महामारीचे संकट असतानाही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. परंतु खरोखरच आपण स्वातंत्र्य झालो का असा विचार येत आहे. या दिवशीही पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुले रस्त्यावर झेंडे विकत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून आज ७४ वर्षे पूर्ण होऊनही देशातील गोरगरीब जनता आजही शिक्षणापासून वंचित राहत पोट भरण्यासाठी स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना झेंडे विकण्याची वेळ आली हेच का आपले स्वातंत्र्य असा सवाल उभा रहातो.

शासनकर्त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर वस्तू विकणारी मुलेही शिक्षणापासून वंचीत असल्याचे चित्र दिसते. तरी या मुलांची शिक्षण व इतत सुविधांची जेणेकरून ती मुले रस्त्यावर पोटाची खळगी भरण्यापेक्षा शिकून सवरून देशाचे सुजाण नागरिक बनतील याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा देशात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत राहील परंतु रस्त्यावरील लहान मुलांचे हे भयानक चित्र नेहमीच पहावयास मिळेल असा सवाल उपस्थित होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.