Press "Enter" to skip to content

आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन नागरी सुरक्षा मॉकड्रिल


प्रतिनिधी आवरे( सचिन पाटील)

दैनंदिन जीवन हे खूप आज कठीण होऊन बसले आहे. आजच्या वैज्ञानिक जीवनात मानव हा प्रगतीकडे वाटचाल जरूर करीत आहे .परंतु आजच्या या धाकाधुकीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा आपत्कालीन संकट हे मानवी जीवनात येईल हे सांगता येणार नाही तसेच आज जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर असताना व्यक्तिगत सुरक्षाही महत्त्वाची आहे अचानक दुर्घटना किंवा आगीचा भडका उडाला असता एखाद्या व्यक्ती हे काम करू शकतो यासाठी आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात आपतकालीन व्यवस्थापन व नागरी सुरक्षा यांच मॉकड्रिल विद्यालयात आज खास विद्यार्थ्यांसाठी व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यासाठी आयोजित करण्यात आले होते.

यासाठी प्रामुख्याने कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणाने आग लागली आगीचा दाह किंवा भडका उडाला तर अशा आपत्कालीन परिस्थितीत ही आग अगदी सोप्या पद्धतीने कशी विझवायची म्हणजे याच प्रात्यक्षिका हे जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात दाखवले विद्यार्थ्यांनी या मॉकड्रिल चा अभ्यास काळजीपूर्वक व निरीक्षणपूर्वक केला भविष्यात अशा प्रकारचे घटना आपल्या आसपास व जवळ लागलीच झाली तर त्यासाठी प्रात्यक्षिक उपाययोजना म्हणून नक्कीच आग विझवण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला हे प्रात्यक्षिक अग्निशामक दलाचे अधिकारी साहेब श्री अमित कांबळी साहेब यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले.

यात विविध प्रकारची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे श्री अमित कांबळी साहेब (अग्निशामक दलाचे अधिकारी )आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे खजिनदार व विश्वस्त श्री वामन ठाकूर सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग हा उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे विद्यालयातील सहशिक्षक श्री अनिल पाटील सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे क्रिडाशिक्षक शुभम ठाकूर सर यांनी केले अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल विद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन नागरिक सुरक्षा यांचे मॉकड्रिल पार पडले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.