सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
खालापूर शहरातील महेश मधुकर घैसास( 48) या तरूणाचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खालापूरातील प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारा महेश यानी कोरोना काळात देखील अनेकाना स्वतःच्या इको टॅक्सीतून ने आण करित मदत केली होती.शनिवारी सकाळी महेश यांची तब्येत अचानक खालावल्यानंतर खालापूर नंतर खोपोली येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले होते.त्यानंतर अधिक उपचारासाठी पनवेल येथे नेत असताना ऑक्सिजन सिलेंङर वाटेतच संपल्याने महेशला श्वास घेणे कठिण होवून त्याचा मृत्यू झाला.या घटनेनी खालापूरवर शोककळा पसरली आहे.






Be First to Comment