
पनवेल: महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, काही नवीन नियुक्त्यां करण्यात आल्या आहेत. पनवेल रेल्वे प्रवासी समस्याच्या समाधानास अधिक गती मिळण्या साठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासीमहासंघातर्फे महासंघाच्या ‘पनवेल युनिट सचिव’ पदी पनवेलमधील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप भास्कर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यभाराला जोरदार सुरुवात:
नवनियुक्त सचिव संदीप चव्हाण यांनी आपला पदभार स्वीकारताच प्रवाशांच्या हितासाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा आक्रमक कार्यपद्धतीचा वारसा पुढे चालवत संस्थेचे अध्यक्ष व ZRUCC सदस्य श्री. अभिजीत धुरत तसेच सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र नेमळेकर यांच्या मार्गदर्शना खाली कामाला जोमाने सुरुवात केली आहे. सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र नेमळेकर, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पनवेल-ठाणे युनिट प्रमुख श्री गणेश परब यांनी तसेच उरण विधानसभा क्षेत्र जिल्हा प्रमुख व मा. आमदार श्री मनोहर भोईर, तालुका प्रमुख श्री महेंद्र गायकर, वडघर विभाग प्रमुख श्री नंदकुमार मुंडकर, करंजाडे विभाग प्रमुख श्री रोहिदास भोईर, पनवेल उपविभाग प्रमुख श्री राजेंद्र वायंगणकर , पनवेल तालुका युवा सेना प्रमुख श्री निखील भोपी व महिला उप शहर संघटिका सौ प्रीती मांडेकर , तसेच करंजाडे वडगाव शहर पदाधिकारी, महिला आघाडी सदस्य युवा सेना सदस्य आणि ज्येष्ठ शिवसैनिक इत्यादी यांनी श्री संदीप चव्हाण यांच्या नियुक्तीचे विशेष स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पनवेल रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्या साठी व समाधानासाठी ही नवीन टीम तत्पर व आग्रही राहणार असल्याचे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.





Be First to Comment