
पनवेल दि.२७(वार्ताहर): पनवेल मधील दुर्पता तारासिंह साउद ऊर्फ छोटी हिने बंगळूरू येथे पार पडलेल्या ६९ राष्ट्रीय बॉक्सिंग शालेय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र आणि पनवेलचा मान वाढवला. याबद्दल पनवेल महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रविण जाधव, नगरसेवक लतीफ शेख, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख प्रविण जाधव. विभाग प्रमुख जुनैद पवार शाखा प्रमुख मयुरेश पाटील यांनी धुर्पता तारसिन्ह साऊद हिच्या घरी जाऊन सत्कार केला तसेच तिला पुढील वाटचालीस शहर शाखेतर्फे मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
दुर्पताने सुरवातीच्या लढतीमध्ये तेलंगाना, केरळचा बॉक्सरचा पहिल्याचे फेरीत हरवून क्वार्टर फाइनलमध्ये हरियाणाची बलाढ्य खेळाडू किरणला एकतर्फी हरवून सेमी फायनलमध्ये कर्नाटकला हरवून अंतिम फेरीमध्ये झारखंडच्या पूर्व राष्ट्रीय विजेतीवर आक्रमक खेळी खेळून पराभूत केले आणि राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.





Be First to Comment