
पनवेल : प्रतिनिधी
वर्धापन दिनाच्या निमित्ताने कौटिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषद प्रायमरी शाळा ओवे कॅम्प (ता. पनवेल, जि. रायगड) येथे १७५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच लहान मुलांना आनंद देण्यासाठी खाऊचेही वाटप करण्यात आले.
संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विश्वासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, समाजातील वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी श्री. दीपक थोरात, श्री. निलेश कुटे, श्री. आशिष मिश्रा, श्री. अभिनय सिंग, श्री. सतीश जाधव, श्री. अभिषेक सिंग, सौ. जयश्री सुतार, स्वयंसेवक तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.





Be First to Comment