Press "Enter" to skip to content

घरगुती कारणातून तरुणीने केली आत्महत्या

माची प्रबळगड येथील दरीत आढळला मृतदेह

पनवेल, दि.26 (संजय कदम) ः घरगुती कारणावरुन एका तरुणीने पनवेल तालुक्यातील माची प्रबळगडाच्या खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली असता पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोयंजे बीटच्या अमलदार यांना बातमी मिळाली की एक महिला ही माची प्रबळगड याच्या वरील टोकावरून कसल्या तरी कारणाने उडी मारून आत्महत्या करत असल्याबाबत कळवले त्यावर मिळालेल्या माहितीवरून पोयंजे बीटचे सहाय्यक फौजदार मिस्त्री, पोलीस शिपाई जाधव व पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत हे वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी गेले असता प्रथमता कोणतीही महिला घटनास्थळी दिसून येत नव्हती, बातमी देणार्‍या इसमास संपर्क साधला असता त्याने फोन बंद केलेला आढळून आला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजपूत, पीसी जाधव व स.फौ. मिस्त्री असे स्वतः माची प्रबळगड यावर स्वतः चढून वरती जाऊन त्याबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु योग्य ती माहिती न मिळाल्याने सदर ठिकाणी असणारे आजूबाजूला वस्तीतील असणार्‍या लोकांकडे बातमी घेऊन सदर ठिकाणी एक महिला त्यांना दिसून आल्या बाबत माहिती प्राप्त करून लागलीच आजूबाजूच्या परिसरातील काही मुलं सोबत घेऊन माझी प्रबळगड येथे शोध मोहीम राबवली. त्यात त्यांना माची प्रबळगड येथील दरीत एक संशयित गोष्ट आढळून आले असता लागलीच दरीकडे शोध मोहीम  राबवून  एक महिला ही पडलेल्या अवस्थेत दिसून आली.

त्यावर लागलीच वरील पथक व गावातील काही युवक यांना सोबत घेऊन सदर महिलेचा शोध घेतला, सदर महिला ही जखमी अवस्थेत दिसून आल्याने व तिची हालचाल होत नसल्याकारणाने लागलीच एका साडी मध्ये तिला गुंडाळून खांद्यावर घेऊन तिला लवकरात लवकर उपचार देण्याकरिता लागलीच गड उतरून रुग्णवाहिका बोलावून तिला सरकारी रुग्णालय येथे आणण्यात आले. सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिला तपासले असता तिला मृत घोषित केलेले होते सदर महिलेबाबत माहिती प्राप्त केले असता तिचे नाव प्रीती सिंग राहणार सेक्टर 12र कोपरखैरणे नवी मुंबई असे असून घरगुती कारणामुळे तिने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. झाल्या घटना वरून पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल करण्यात आलेला आहे.

घनदाट जंगल, दुर्गम मार्ग आणि कलावंतीण दुर्गाच्या वाटेवरील पायर्‍या खडकात खोदलेल्या असून त्या अत्यंत अरुंद आहेत. काही ठिकाणी तर पायर्‍यांची उंची खूप जास्त आहे आणि पकडण्यासाठी कोणतेही रेलिंग किंवा कडा नाही.निसरडी वाट यामुळे हा किल्ला अत्यंत धोकादायक होतो. पायवाट अरुंद, खडकाळ व अंधार असल्याकारणाने पाय घसरण्याची दाट शक्यता होती. प्रबळगडाच्या माथ्यावर जाणारी वाट घनदाट जंगलातून आणि निसरड्या खडकांमधून होती. सदरचा गड हा 2300 मीटर उंचीचा असून दरी ही 1200 मीटर खोल आहे, सदरची महिलाही दरीत बाराशे मीटर खोल खाली पडलेली दिसून आल्याने सदर ठिकाणी दोरीचा वापर करून पायवाटामार्फत सदर महिलेचा शोध घेण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.