
नवी मुंबई विमानतळावरून ६ नवीन मार्गांवर इंडिगो ची ए टी आर विमानसेवा सुरू होणार
पनवेल / प्रतिनिधी
भारताची देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) पासून सहा ठिकाणांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली. अहमदाबाद , दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूरसाठी नवीन थेट उड्डाणे २९ मार्च २०२६ पासून सुरू होतील.
या मार्गांवर एअरलाइन त्यांचे एटीआर विमान चालवेल त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत प्रवासाकरता एक सुलभ पर्याय उपलब्ध होईल आणि या प्रदेशात प्रादेशिक हवाई संपर्क वाढेल. इंडिगोने त्यांच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल ऍप आणि ट्रॅव्हल एजंट्ससह सर्व माध्यमांद्वारे उड्डाणांसाठी तिकीट बुकिंग सुरू केली आहे.
नवी मुंबईहून येणाऱ्या नवीन विमानांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
१)अहमदाबाद – नवी मुंबई ६ई ७०१८
दैनंदिन सेवा १९:१० ते २०:४०
२)नवी मुंबई – अहमदाबाद ६ई ७०१७ दैनंदिन सेवा २१:१० ते २२:३५
३)नवी मुंबई – दीव ६ई ७०२३ दैनंदिन सेवा १०:०५ ते ११:१५
४)दीव – नवी मुंबई ६ई ७०२४ दैनंदिन सेवा ११:४० ते १२:४५
५) नवी मुंबई – गोवा ६ई ७०३७ दैनंदिन सेवा ११:०५ ते १२:३५
६) गोवा – नवी मुंबई ६ई ७०३८ दैनंदिन सेवा १७:२५ ते १८:५५
७)नवी मुंबई – गोवा ६ई ७०७७ दैनंदिन सेवा १३:१५ ते १४:२५
८) गोवा – नवी मुंबई ६ई ७०७८ दैनंदिन सेवा १९:४५ ते २१:००
९)नवी मुंबई – राजकोट ६ई ७०४५ दैनंदिन ०७:०० ते ०८:१५
१०) राजकोट – नवी मुंबई ६ई ७०४६ दैनंदिन सेवा ०८:४५ ते ०९:४५
११)नवी मुंबई – बेळगाव ६ई ७०१५ दैनंदिन सेवा १०:२० ते ११:३५
१२)बेळगाव – नवी मुंबई ६ई ७०१६दैनंदिन१७:३५१८:४५
१३) नवी मुंबई – कोल्हापूर ६ई ७०४१ दैनंदिन सेवा ०८:०० ते ०९:१५
१४) कोल्हापूर – नवी मुंबई
६ई ७०४२ दैनंदिन सेवा ०९:३५ ते १०:३०
१५) नवी मुंबई – कोल्हापूर ६ई ७०४३ दैनंदिन१९:२० ते २०:३०
१६) कोल्हापूर – नवी मुंबई
६ई ७०४४ दैनंदिन २०:५० ते२१:४५
तथापि, या नवीन मार्गांवरील उड्डाणांचे वेळापत्रक नियामक मंजुरींच्या अधीन आहे. इंडिगो त्यांच्या ताफ्यात असणारी ७८ प्रवाशांची आसन क्षमता असलेली एटीआर ७२-६०० विमाने या मार्गांवर चालवीणार आहेत.






Be First to Comment