Press "Enter" to skip to content

पनवेल बनतयं उडता पंजाब

तळोजा घोट कॅम्प येथे १ कोटी २ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; दोन पंजाबी आरोपी ताब्यात

पनवेल दि. २४ (वार्ताहर) : पनवेल जवळील तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात १ कोटी २ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांचे पथकाला गुप्त बातमीदारामार्फत “महावीर मॅजेस्टी, घोट कॅम्प, तळोजा येथे सुरींदर सिंग उर्फ काळु तसेच त्याचा भाऊ मनिंदर सिंग असे हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांचे राहते घरी त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करून ठेवला आहे” अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. याबाबत खात्री करून कारवाई केली.

मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथक व पंच असे ल खबरीतील ठिकाणी जावुन एनडीपीएस कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार छापा कारवाई करून पंजाब येथुन आलेल्या दोन आरोपी १) सुरींदर गुरुजंत सिंग उर्फ काळु वय २४ वर्षे, २) मनिंदर गुरुजंत सिंग वय-२७ वर्षे, दोन्ही मुळ रा. निहालसिंगवाल, जि. मोगा, राज्य, पंजाबयांचे ताब्यातुन एकुण ११८ ग्रॅम वजनाचा हेरॉईन व १४३.६ ग्रॅम अफिम असा एकुण १ कोटी २ लाख ,१९,५००/- रूपये मुद्देमाल बेकायदेशिररित्या विक्री करीता स्वत: चे कब्जात बाळगले असताना मिळुन आले म्हणुन इसम नामे १) सुरींदर गुरूजंत सिंग उर्फ काळु, २) मनिंदर गुरुजंत सिंग व पाहीजे आरोपी ३) ट्रक ड्रायव्हर यांचेविरुध्द तळोजा पोलीस ठाणे गु. रजि. नंबर ७८/२०२६ एन.डी.पी.एस.कायदा १९८५ चे कलम ८ (सी), २१ (बी), १७, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहे.

सदरचे कारवाई मध्ये सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, अति. कार्यभार, आर्थिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सपोनि तुषार माने, पोहवा तायडे, पोहवा मेहेतर, मपोना पाटील, पोशि पालवे, चालक पोशि भाबड हे सहभागी होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.