
रागाने घरातून निघून गेलेली मुलगी सहा तासांच्या आत आई-वडिलांच्या ताब्यात
नागोठणे : याकूब सय्यद
नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा र. क्र. 42/2026 कलम 137(2) अन्वये दि.21/02/2026 अन्वये दाखल गुन्ह्यातील अपहरित बालिका हिचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी स.पो. नि. सचिन कुलकर्णी यांनी तात्काळ दोन पथके रवाना करून सीसीटीव्ही फुटेज याचे आधारे गुन्ह्यातील अपहरित मुलगी हिचा शोध सुकेळी परिसरात घेतला असता सदर मुलगी ट्रकने पनवेल येथे गेली असल्याचे समजल्याने.
पनवेल येथून शिवडी मुंबई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. शिवडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शोध घेतला असता ती शिवडी परिसरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये मिळून आलेली आहे. सदर अपहरित मुलगी हीस शिवडी पोलीस ठाण्यात नेऊन जवळच्या वैद्यकीय सरकारी रुग्णालयांमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करून सदर मुलगी हिला सुखरूप ताब्यात घेऊन तिला आई-वडिलांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे. आई वडील रागावल्यामुळे सदर मुलगी घरातून रागावून निघून गेली असलेले ची माहिती सदर मुलीने दिली.
सदरची कामगिरीही रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी स.पो.नि सचिन कुलकर्णी, पो. उ.नि. पावरा, पो.हवा. नागावकर, म. सहा. फौ. संचिता सानप यांनी केलेली असून रायगड पोलीस दलातिला नागोठणे पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






Be First to Comment