Press "Enter" to skip to content

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अनुपस्थितीत संघटनेचा पगारवाढीचा करार

वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे कामालाही थांबवू नका – महेंद्रशेठ घरत

पनवेल : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेकडून सातत्याने विविध कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार केले जात असतात. तळोजा MIDC मधील मे. हुहातामाकी इं. प्रा. ली या कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार मागील २२ महिन्यांपासून प्रलंबित होता. व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात समेट होवून करार करण्याचे ठरले. परंतु न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत पूर्वनियोजित अंटार्टिका दौऱ्यासाठी गेले असल्यामुळे करारास वेळ लागू शकत होता त्यामुळे कामगरांना फेब्रुवारी महिन्याचा पगार वाढवून मिळण्यास अडचण येत होती. हि बाब कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना दुरध्वनी वरून कळविली असता त्यांनी थांबू नका, वेळ कोणालाही थांबत नाही कामही थांबवू नका असे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मे. हुहातामाकी इं. प्रा. ली तळोजा या कंपनीतील कामगारांसाठी ८३००/- रुपये पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्या मुळे प्रत्येक कामगाराला सव्वा लाख रुपये थकबाकी मिळणार आहे.

या करारनाम्या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस श्री वैभव पाटील तर व्यवस्थापनातर्फे सिनियर क्लस्टर एच आर मॅनेजर श्री. विक्रम शिंदे, सिनियर प्लॅन्ट मॅनेजर सचिन चव्हाण, एच आर मॅनेजर सपना घोरपडे तसेच कामगार प्रतिनिधी बाळाराम दारावकर, विजय अल्हट, तुकाराम निघुकर, निवृत्ती निघुकर उपस्थित होते. दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या निर्णयामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले व त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.