

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी
मुंबई प्रतिनिधी :(सतिश पटील)
आझाद मैदान, मुंबई येथे शेकडोच्या संख्येने दि. बा. पाटील साहेबांचे समर्थक एकत्र जमून भव्य आणि शिस्तबद्ध आंदोलन यशस्वीरीत्या पार पाडले.
आझाद मैदान येथे उसळलेला जनसमुदाय हा केवळ गर्दी नव्हता, तर तो स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आवाज होता. “नवी मुंबई विमानतळाला नाव दि. बा. पाटील साहेबांचेच!” या एकमुखी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित मा. खासदार सुरेश म्हात्रे (भिवंडी ) माजी आमदार गणेश गायकवाड यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. सिडको, राज्य सरकार, केंद्रसरकार, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस ,नागरी विमानमंत्री मुरलीधर मोहोळ अशा अनेकांना भेटून तसेच विधानसभेत प्रलंबित नामकरणाचा मुद्दा मांडून अजूनही का दिरंगाई होत आहे.आता मंत्रालयात देखील आवाज उठवण्याचे अव्हान करण्यात आले.असे अनेक भूमिपुत्रांचे प्रलंबित मुद्दे मांडण्यात आले.
नवी मुंबई आणि रायगडच्या मातीत ज्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य वेचले, त्या लोकनेत्याचा सन्मान राखण्यासाठी आज जनतेने एकजूट दाखवली. हे आंदोलन शांततामय, संघटित आणि ठाम भूमिकेचे प्रतीक ठरले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ला नाव दि. बा. पाटील साहेबांचेच देण्यात यावे, या करिता प्रखर आंदोलन उभारलं जाईल .कोणत्याही राजकीय नेत्यानं कडून रक्कम न स्वीकारता प्रत्येक कडून किमान 1000 /-रुपये देणगी स्वीकारणेचे आवाहन करताच लागलीच सुमारे 96000/- रुपये तात्काळ रक्कम जमा झाली .अध्यक्ष सन्माननीय दशरथ दादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वा खाली लवकरच सर्व जिल्ह्यात प्रचार प्रसार रथ फिरणार आहे .






Be First to Comment