Press "Enter" to skip to content

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त प्रभाग १८ मध्ये विशेष स्वच्छता मोहीम

पनवेल, दि.23: पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी सावरकर चौक व विसर्जन घाट परिसरात महापौर नितीन पाटील यांच्या सक्रिय सहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान सावरकर पुतळा परिसर, घाट परिसर तसेच बल्लाळेश्वर तलावाच्या आतील साचलेला कचरा काढून संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच परिसर पाण्याने धुऊन स्वच्छ व सुशोभित करण्यात आला.

यावेळी. महापौरांनी स्वच्छतेबाबतची बांधिलकी कृतीतून दाखवून देत त्यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छता काम अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या उपक्रमावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर तसेच सर्व मुकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छतेच्या संदेशाला अनुसरून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.