
पनवेल दि.२०(संजय कदम): पनवेल तालुकफयातील आजिवली गाव परिसरात एका किराणा विक्री करणाऱ्या दुकानात व गोदमात पनवेल तलौक पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केला असून या परकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
तालुक्यातील आजिवली गाव येथील एका किराणा दुकानात तसेच गोदामात बेकायदेशीररित्या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री आरोपी रामसौदागर सहदेव भगत, (वय ६५ ) हा करत असल्याची गोपनीय माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिरुद्ध गिजे, पो उपनि हर्षल राजपूत, दीपक शेळके, पोहवा देवरे, धुमाळ, कुदळे, तांडेल, बाबर, म्हारसे, पवार, मपोहवा रोडगे, पोहवा पाटील, सोशी भगत आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्यांच्या कडून जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा केशर युक्त विमल पान मसाला हस्तगत केला असून त्यांच्या विरुद्ध ४३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७५, १२३. २२३ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम ३(१) (२२) (३१)(२२)(V) २६(२)(१), २६(२)(V) २७(३) (३) सह अन्न सुरक्षा मानदे अधिनियम २०११ ये कलम ५९(ii) भा.द.वि कलम २७३, ३२८, १८८ अन्व्ये कारवाई केली आहे.



Be First to Comment