Press "Enter" to skip to content

शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण यांची मागणी

पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टपालनाका चौकात (शनिमंदिर) वाहतूक कर्मचारी नेमण्याची मागणी

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टपालनाका चौकात (शनिमंदिर) वाहतूक कर्मचारी नेमण्याची शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण यांनी मागणी केली असता या मागणीची तत्परतेने दखल घेत वाहतूक शाखेचे वपोनि औदुंबर पाटील यांनी तात्काळ एक अधिकारी व एक कर्मचारी सदर ठिकाणी नियुक्त करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे.

पनवेल शहरातील टपालनाका परिसरामध्ये सायंकाळी 6 ते 9 या वेळेत प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन कडून येणारे सर्व प्रवासी करंजाडे नोड मध्ये जाण्यासाठी मुख्यत्वेकरून याच रस्त्याचा वापर करतात. त्यामूळे या परिसरात वाहतूक कॉडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषकरून मुस्लीम समाजाच्या पवित्र महिन्यातील रोजे सुरू झाले आहेत. आधीच वाहतूक कोंडीमूळे वर्दळ असणा-या या परिसरात उपरोक्त कालावधीत वाहतूक कोंडीची समस्या आधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीमूळे प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा ही प्रश्‍न ऐरणीवर येऊ शकतो. तरी वरील सर्व बाबींचा विचार करून किमान पुढील एक महिना टपालनाका व भाजी मार्केट (शिवाजी रोड) परिसरात आपले वाहतूक कर्मचारी प्राधान्याने नेमणुकीस ठेवावेत ही महत्वाची सूचना चंद्रशेखर सोमण यांनी वाहतूक शाखेचे वपोनि औदुंबर पाटील तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत सदर ठिकाणी तात्काळ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने चंद्रशेखर सोमण यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पनवेल शहर वाहतूक शाखा व पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी तत्परतेने तक्रारीची दखल घेवून संबंधित ठिकाणी अधिकारी, कर्मचारी उपस्थित केल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.

चंद्रशेखर सोमण


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.