Press "Enter" to skip to content

मोबाईल मेडिकल युनिट्स ४२ गावांपर्यंत थेट आरोग्यसेवा

प्रत्येक दारापर्यंत आरोग्यसेवा ; दीपक फर्टिलायझर्सची समुदाय आरोग्याबाबतची दृढ बांधिलकी

पनवेल (प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक परिसरातील अनेक कुटुंबांसाठी आरोग्यसेवा मिळवण्यासाठी लांबप्रवास तसेच अतिरिक्त खर्चही करावा लागू नये यासाठी या वास्तवाची जाणीव ठेवून, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून आसपासच्या गावांमध्ये मूलभूत आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. “गेल्या काही वर्षांत, दीपक फर्टिलायझर्सच्या आरोग्य कार्यक्रमांनी दैनंदिन वैद्यकीय गरजा, आजारांचे लवकरात लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपचार यांवर विशेष भर दिला आहे; प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक,महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवून हे उपक्रम राबवले जात आहेत.

 मोबाईल मेडिकल युनिट्स ४२गावांपर्यंत थेट आरोग्यसेवा

दूरच्या रुग्णालयांपर्यंत वारंवार प्रवास टाळण्यासाठी,दीपक फर्टिलायझर्स तळोजा परिसरातील ४२हूनअधिक गावांमध्ये दोन फिरते दवाखाने चालवत आहे. हे फिरते दवाखाने ग्रामपातळीवरच तज्ज्ञांचा सल्ला, मूलभूत औषधे, आरोग्य तपासणी आणि समुपदेशन पुरवतात. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २२,६५१हून अधिक रहिवाशांनी या फिरत्या दवाखान्यांच्या सेवांचा लाभ घेतला आहे. आंबेगावातील रहिवासी नंदा भिवा पाटील सांगतात, “पूर्वी छोट्या आजारांसाठी सुद्धा पनवेल किंवा नवी मुंबईला जावे लागायचे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ते खूप कठीण होते. आता डॉक्टर आमच्या गावात नियमित येतात.आम्हाला मोफत औषधे आणि सल्ला मिळतो, त्यामुळे पूर्ण दिवस प्रवास करण्यात जात नाही.

देवीचापाडा येथे परवडणारी पॅथॉलॉजी सेवा आणि आनंद हॉस्पिटल, तळोजा येथे निदान सेवा

लवकर आणि अचूक निदानाचे महत्त्व ओळखून, डीएफपीसीएलने देवीचापाडा गावात पॅथॉलॉजी सेंटर सुरू केले आहे, ज्यामध्ये सवलतीच्या दरात पॅथॉलॉजी चाचण्या केल्या जातात. तसेच, आनंद हॉस्पिटलच्या सहकार्याने एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, टू-डी इको आणि डायलिसिस यांसारख्या सुविधा पुरवल्या जात आहेत, ज्यामुळे आसपासच्या गावांतील लोकांसाठी आवश्यक निदान सेवा आता अधिक सुलभ झाल्या आहेत.महोदर गावातील हरिचंद्र सीनारे सांगतात कि, खाजगी लॅबमध्ये तपासण्या महाग असल्यामुळे अनेकदा चाचण्या वारंवार टाळल्या जायच्या. या केंद्रामुळे आम्हाला वेळेवर आणि अतिशय कमी दरात रिपोर्ट मिळतात. दीर्घकालीनआजार असणाऱ्यांसाठीही सुविधा खूप उपयुक्त आहे.

 नेत्र तपासणी शिबिरे — १,१५४नागरिकांची नेत्र तपासणी

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या भाग म्हणून दीपक फर्टिलायझर्सने पनवेलमधील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवीन पनवेलमधील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या सहकार्याने या वर्षात सात सामुदायिक नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत १,१५४हून अधिक लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आले.पडघे गावातील हिरामन भोईर यांनी सांगितले कि,  “दृष्टी कमजोर झाल्यामुळे शेतीची कामे करणे कठीण झाले होते. नेत्र तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रियेनंतरआम्ही आता दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करू शकतो. शिबिरामुळे आमच्या गावाला वेळेवर मदत मिळाली.

समुदायाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी प्रयत्न

ग्रामीण भागात सशक्त समुदाय घडवण्यासाठी आरोग्यसेवांचा भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळोजा परिसरातील आपल्या सातत्यपूर्ण कामाद्वारे दीपक फर्टिलायझर्सने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या, सुलभ आणि परवडणाऱ्या उपाययोजना राबवत आहे. “तळोजा परिसरातील आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष गरजा ओळखून मोबाईल क्लिनिक, डायग्नोस्टिक्स किंवा नेत्र तपासणी असो.समुदायाला वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हाच आमचा प्रयत्न आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या सातत्यपूर्ण सीएसआर प्रयत्नांमुळे तळोजा परिसरातील ग्रामीण भागात आरोग्यसेवा अधिक सक्षम, उपलब्ध आणि लोकाभिमुख होत आहे.

– नरेशकुमार पिनिसेट्टी, अध्यक्ष – कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दीपक फर्टिलायझर्स 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.