
स्वच्छता आणि नागरी आरोग्य सुविधांना प्राधान्य देणार — महापौर नितीन पाटील यांनी शेअर केले व्हिजन
पनवेल / प्रतिनिधी
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेले नितीन भाई पाटील यांचा सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातील तमाम सदस्यांनी यावेळी नितीन भाई पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
महापौर नितीन भाई पाटील यांनी यावेळी मंचातील तमाम सदस्यांसोबत वार्तालाप करताना त्यांची ध्येयधोरणे व आगामी व्हिजन शेअर केले. यावेळी नितीन पाटील यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील स्वच्छता व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांना प्राधान्य देऊन त्या अधिकाधिक बळकट करणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक सादर करताना सल्लागार मंदार दोंदे म्हणाले की आज खरे तर आम्ही तमाम पनवेलवासीयांचे अभिनंदन करत आहोत कारण आज पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना एक सजग, प्रामाणिक आणि ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असणारा महापौर लाभला आहे.
नजीकच्या काळात पनवेल तालुका पत्रकार मंचातील सदस्यांसोबत एक व्यापक वार्तालाप कार्यक्रम घेणार असून त्याच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील हर एक समस्येचा निपटारा करण्यासाठी महापौर नितीन पाटील आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संयुक्त विद्यामाने प्रयत्न करणार असल्याचे या सत्कार सोहळ्यात जाहीर करण्यात आले.
यावेळी महापौर नितीन पाटील यांना सन्मानित करताना पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर,खजिनदार दत्ता कुलकर्णी, प्रवीण मोहोकर, राजू गाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
Tomato tomato



Be First to Comment