
भारताला विकसित करताना प्रत्येकाला योगदान देण्याची आवश्यकता आहे : – कपिल पाटील
कर्जत – ( विजय मांडे )
'स्प्रिंग फाएस्टा म्हणजे आज तुमच्या कष्टाचा आणि मैत्रीचा दिवस आहे. मी सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधी होतो. त्यावेळी माझे नाव न घेतल्याने मी त्यावेळचे वार्षिक स्नेहसंमेलन रद्द केले होते. मात्र त्यानंतर मी पंचायत समिती सभापती होतो. त्यावेळी त्याच विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाट्नाला माला आमंत्रित केले. म्हणजे मीच बंद केलेले स्नेहसंमेलन मलाच सुरु करावे लागले. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी शंभर पेक्षा शंभर गुण मिळविले आहेत. आम्हाला शंभरला तीन ने भागले तर जितके गुण असतात. तितके आम्हाला मिळायचे मग त्यात ग्रेस मार्क टाकून आम्ही पास होत आलो. तरी आम्ही हत्ती वरून साखर वाटायचो. तुम्ही मिळविलेले गुण उल्लेखनीय आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला तर आयुष्यात कधीही अपयश येणार नाही. भारताला विकसित करताना प्रत्येकाला योगदान देण्याची आवश्यकता आहे.' असे महत्वापूर्ण प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले.
कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात “स्प्रिंग फाएस्टा” वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभचे आयोजन करण्यात आले होते. कपिल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश मुथा, सचिव प्रदीपचंद्र श्रुंगारपुरे, खजिनदार झुलकरनैना डाभीया, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, डॉ. मोहन काळे, डॉ. रामचंद्र गायकवाड, उपप्रचार्य राजकुमार नारखेडे, राम माळी आदींसह विद्यार्थी प्रतिनिधी हर्षद हडप, कशिश भगत, अनुष सुर्वे, युक्ता चौधरी, साक्षी राऊत उपस्थित होते. डॉ. पिल्लेवान यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविकात महाविद्यालयाचा चढता आलेख सादर केला.
कपिल पाटील पुढे म्हणाले, 'रूळलेल्या वाटांवर कुणीही चालतो परंतु स्वतःची वेगळी वाट करतो तो खरा विजेता ठरतो. तुम्ही त्यातील मुले आहात. भविष्यात आपल्याला आपल्या क्षेत्रात उंची गाठायची असेल तर कोणत्या तरी रस्त्याने चालावे लागेल. तो चांगला असेल तर प्रश्न नाही. परंतु तुमचे ध्येय चांगले असेल तर तुम्हाला रस्ता कुठे जातो हे विचारायची गरज नाही. आपोआपच तुमचे ध्येय गाठू शकाल. तुम्ही देशाचे भावितव्य घडवणारी मुले आहात. तुम्ही यापुढे असे काम करा. तुम्हाला विचारल्यावर तुम्ही जेंव्हा आम्ही कोकण ज्ञानपीठचे विद्यार्थी आहात. असे सांगाल त्यावेळी आम्हालाही समाधान वाटेल. त्यामुळे आम्हालाही तुमच्याकडून अपेक्षा आहात. जगाच्या पाठीवर एकही असा संगणक नाह की धान्याचा एक दाणाही तयार करता येईल. एका दाण्याचे हजार दाणे करता येतील. शेवटी संगणक माणूसच चालवतो. हे लक्षात ठेवा. आपण आता येथे कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन तसेच डिम युनिव्हर्सिटी आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी सर्वांची साथ लागणार आहे.' त्यांनी मायकल जोर्डनच्या यशाचे उदाहरणही दिले.
प्रकाश मुथा यांनी 'वर्ल्ड कप जिंकलेल्या कपिल देव सारखेच कपिल पाटीलही आहेत. ते चांगले काम उभे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्हांला कुणीही हरवू शिकत नाही.' प्रदीप श्रुंगारपुरे यांनी, संस्थेच्या ३७ वर्षाच्या वाटचालीत कितीही संघर्ष आले. तरी सर्वांच्या सहकार्याने आपण त्याला तोंड देऊन संस्थेची भरभराट कशी होईल. त्याकडेच लक्ष दिले.' असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा आहेर आणि कु.ऋतुजा बोरवडे यांनी केले. याप्रसंगी प्रा. संजय पाटील, डॉ. दीपाली केसकर, डॉ. अनंत नागपुरे, प्रा. गिरीश दाखवे, प्रा. अनुप कुंटे, प्रा. दुराझ टिवले, प्रा. शब्बीर कर्जतवाला, संजय लाड, राहुल देशमुख आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.




Be First to Comment