Press "Enter" to skip to content

भरधाव टेम्पोची स्कूल बसला धडक ; २ विद्यार्थी जखमी


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज पनवेल जवळील पुणे-मुंबई हायवेवर पारपुंड गावाजवळील वेलकम हॉटेलच्या समोरील रस्त्यावर घडली आहे.

स्कूल बस चालक संदीप मोहिते हा त्याच्या ताब्यातील एमएच-06-झेड-7855 ही घेवून जात असताना समोरुन आलेल्या टेम्पो क्र.एमएच-01-सीव्ही-7798 वरील चालक मिलींद सपकाळ (43 रा.मुंबई) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याची गाडी हयगयीने चालवून समोरुन स्कूल बसला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूल बसमधील 8 वर्षीय मुलगी तसेच 16 वर्षीय मुलगा हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच स्कूल बसचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टेम्पो चालकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि सचिन पोवार करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.