

धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय जनतेने धनशक्तीला नाकारले – प्रसाद भोईर
पेण, ता. १० (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या चार आणि पेण पंचायत समितीच्या आठ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले असले तरी शिहू गटात शिवसेना ठाकरे गटाच्या पल्लवी भोईर यांनी भाजपच्या शर्मिला वैकुंठ पाटील यांचा ४ हजार ४३ मतानी पराभव केला तर पंचायत समितीच्या शिहू गणात संजय भोईर आणि डोलवी मध्ये प्रीती पाटील यांनीही येथे मशाल पेटवली आहे.
रायगड जिल्हा परिषद पाच आणि पेण पंचायत समितीच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी दि. ९ फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या केईएस स्कूलमध्ये पार पडली यात दादर गटातून भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांचा ८ हजार १२० मतांनी तर वडखळ मध्ये झालेल्या चौरंगी लढतीत प्रभाकर म्हात्रे यांनी पुन्हा बाजी मारली असून जिते गटात आदिवासी समाजाच्या ताई जोमा दरवडा आणि महलमिऱ्या डोंगर मधून आदिवासी समाजाचे जनार्दन भस्मा असे भाजपचे चार उमेदवार निवडून आले आहेत.तर शिहू गटात शिवसेना ठाकरे गटाच्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी भाजपच्या शर्मिला वैकुंठ पाटील यांचा ४ हजार ४३ मतांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन केला तर पेण पंचायत समिती जिते- गणात संजय डंगर, वाकरुळ- कमल पवार, रावे- अस्मिता पाटील, दादर- स्मिता पाटील, वाशी- विवेक म्हात्रे, वडखळ- प्रदिप म्हात्रे, महलमिऱ्या डोंगर – सुशांत खाकर, वडगांव- मेघा पाटील या आठ जागांवर भाजपने आणि शिहू- संजय भाईर, डोलवी- प्रिती पाटील दोन उमेदवारांनी येथे मशाल पेटवली असल्याने शिहू भागात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
शिहू गटात आम्ही केलेली विकास कामे पाहता तसेच जनतेच्या सुखा दुखात रात्री अपरात्री धावून जात असल्याने येथील मतदार राजा जनशक्तीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला आहे. हा दणदणीत विजय त्यांनी मिळवून दिला असल्याने जनतेने धनशक्तीला नाकारून जनशक्तीचा विजय केला आहे.
प्रसाद भोईर- रायगड जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना ठाकरे गट





Be First to Comment