Press "Enter" to skip to content

भाजपचे जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील ८ हजारांच्या मताधिक्याने विजय

पेणमध्ये भाजपचे वर्चस्व ; जिल्हा परिषद ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांवर विजय संपादन

पेण, ता. ९ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या पाच आणि पेण पंचायत समितीच्या दहा जागांसाठी आज झालेल्या मतमोजणीत पेण तालुक्यात भाजपने वर्चस्व निर्माण केले असून जिल्हा परिषदेच्या चार जागांवर भाजप तर शिवसेना ठाकरे गटाने एका जागी विजय संपादन केला असून भाजप रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांचा दादर गटातून ८ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे.

महाराष्ट्र राज्यात नुकताच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर झाला यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या दादर गटातून वैकुंठ रवींद्र पाटील, जिते मधून ताई जोमा दरवडा, वडखळ गटातून प्रभाकर म्हात्रे, महलमिऱ्या डोंगर मधून जनार्दन भस्मा हे चार भाजपचे उमेदवार विजयी झाले असून शिहू गटातून पल्लवी प्रसाद भोईर या एकमेव शिवसेना उबाठा गटातून निवडून आल्या आहेत.तर पेण पंचायत समितीत जिते गणातून संजय डंगर, वाकरुळ- कमल पवार, रावे- अस्मिता पाटील, दादर- स्मिता पाटील, वाशी- विवेक म्हात्रे, वडखळ- प्रदिप म्हात्रे, महलमिऱ्या डोंगर – सुशांत खाकर, वडगांव- मेघा पाटील या आठ जागांवर भाजपने तर डोलवी गणातून प्रिती पाटील, शिहू- संजय भाईर हे दोन उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे विजयी झाले आहेत.

विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदर मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये राज्यात चांगले यश संपादन करता आले असून पेणमध्ये सुद्धा भाजपने मोठ्या विजय संपादन केला आहे.येथे केलेल्या विकास कामांमुळे येथील जनतेने भाजपला भरभरून मतदान दिले असल्याने येणाऱ्या काळात तालुक्याचा अधिक विकास साधला जाणार आहे.
रवीशेठ पाटील- आमदार पेण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.