Press "Enter" to skip to content

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाचा करिष्मा ; उरणमध्ये कॉंग्रेसचा शंभर टक्के विजय !

उलवे, ता. ९ : उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसने दोन जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या होत्या. त्या दोन्ही जिंकून कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी करिष्मा केला आहे. 

जासई जिल्हा परिषदेच्या गटातून डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून अॅड. अविनाश ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला.  यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विजयोत्सव साजरा केला.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत. रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. आज बॅरिस्टर अ. र. अंतुले साहेब यांची जयंती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मारलेली बाजी कौतुकास्पद आहे. त्यामुळे अंतुले साहेब आणि आणि दि. बा. पाटील साहेब यांना महाविकास आघाडीचा विजय समर्पित करत आहोत.”

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.