Press "Enter" to skip to content

रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार –पालकमंत्री कु.आदिती तटकरे

सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) #

ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त व पोषण मूल्य असलेल्या असून त्या नामशेष होऊ नयेत आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक लाभ व्हावा, म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 52 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सूचित केले की, या रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचा उपक्रम स्वागतार्ह असून या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व महिला शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही प्रोत्साहन म्हणून कौतुक केले.

या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि मधुकर पाटील, अमित उकडे, , आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.