सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
दरवर्षी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महत्वाच्या विविध भागात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर वृक्षारोपण कार्यक्रम करीत असून दरवर्षी विविध फळा फुलांची एकूण ५०० रोपांची लागवड स्वखर्चाने करीत आहेत त्यामुळे सर्व स्तरातून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
नुकताच निसर्ग चक्री वादळाने येथील जवळपास दोन हजारांहून अधिक जुनी झाडे उन्मळून पडली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भरून काढणे अवघड बाब असली तरीसुद्धा यामध्ये स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास काही वर्षातच ही वनराई पुन्हा नव्या जोमाने बहरू शकते त्यासाठी प्रत्येक नागरिकांची मानसिकता असणे आवश्यक आहे.
0हिरवीगार वनराई आणि त्यामुळे निर्माण होणारी शीतल थंड हवेच्या शुद्ध वातावरणामुळे इथे पर्यटक आवर्जून भेटी देत असतात. दरवर्षी वादळी वाऱ्याने तसेच अतिवृष्टीमुळे शंभर दोनशे वर्षापेक्षा जुनी असणारी झाडे उन्मळून पडत असतात. भविष्यात सुध्दा इथले पर्यटन अबाधित ठेवायचे असेल तर ही गर्द झाडी टिकणेगरजेचे आहे. मागील काळात मनोज खेडकर यांनी वखारी नाका ते बाईक हॉटेल पर्यंत करंज जातीची लावलेली रोपे उंच वाढलेली असून या ठिकाणी रहदारी करणाऱ्या पादचाऱ्यांना सावली लाभत आहे. वनसमितीचे मार्फत सुध्दा वनसमितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी काही ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे.तर यावेळेस नगरपरिषदेने या वृक्षारोपणबाबतीत पुढाकार घेतलेला दिसून येत नाही.
एक महिन्यांपूर्वी जवळपास दीडशे रोपे नगरपरिषदेने आणली होती ती आजही येथील नौरोजी उद्यानात पावसात पडून आहेत.ही आणलेली रोपे लोकप्रतिनिधी लावणार आहेत असे समजते परंतु प्रत्यक्षात लोकप्रतिनिधीची वृक्षारोपण बाबतीत स्वतःची मानसिकता नसल्याने रोपांसाठी हजारो रुपयांचा नाहक चुराडा झालेला आहे. वृक्षारोपण करावयाचे नव्हते तर ही रोपे का मागविण्यात आली आहेत.की कुणा ठेकेदारांचा खिसा भरण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे की काय ?असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनोज खेडकर यांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात तसेच अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट अशा विविध महत्वाच्या ठिकाणी ही रोपे लावलेली आहेत. ही कामे करताना संबंधित कार्यकर्त्यांना याच निमित्ताने रोजगाराचे साधन खेडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी मनोज खेडकर यांच्या सोबत वनसमितीचे अध्यक्ष योगेश जाधव, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, राधा खेडकर, राकेश कोकळे,बाबू कासुरडे आदी उपस्थित होते.






Be First to Comment