Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा फुलले कमळ

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा ५९ जागांवर विजय

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केला. मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा तर एक अपक्ष जागा बिनविरोध झाली होती. त्यानंतर गुरुवारी ७१ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल (शुक्रवारी) जाहीर झाला. यामध्ये ५३ जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन भाजप महायुतीने एकूण ५९ जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना पराभवाची धूळ चारून पनवेल महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर सरस ठरले आहेत. 

ही निवडणूक पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भाजप महायुतीने नियोजनबद्ध व संघटित प्रचार केला. विकासकेंद्रित धोरण, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.पनवेलकर सुज्ञ मतदारांनी महायुतीवर दाखवलेला प्रचंड विश्वास तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी घेतलेली अथक मेहनत हे या यशामागील प्रमुख कारण ठरले आहे. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात महायुती यशस्वी ठरली. सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली देशात विकासाची नवी दिशा मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाची मजबूत पायाभरणी केली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संघटन बळकट करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळेच पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीला हा दणदणीत विजय मिळू शकला. हा विजय म्हणजे विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर पनवेलकरांनी दिलेली ठाम शिक्कामोर्तब आहे. नागरिकांना अपेक्षित विकास करण्याचा आम्ही संकल्प कायम केला आहे, त्यामुळे यापुढे विकासाचा झंझावात कायम ठेऊ.

 – आमदार प्रशांत ठाकूर   

बिनविरोध – नितीन जयराम पाटील (प्रभाग १८), ममता प्रितम म्हात्रे (प्रभाग १८), दर्शना भगवान भोईर(प्रभाग १९), रुचिता गुरुनाथ लोंढे (प्रभाग १९), अजय तुकाराम बहिरा (प्रभाग २०), प्रियांका तेजस कांडपिळे (प्रभाग २०)

प्रभाग ०१- विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नितेश बाळकृष्ण फडके

प्रभाग ०४- प्रवीण काळुराम पाटील, परेशा ब्रिजेश पटेल, अनिता वासुदेव पाटील, मधू पाटील 

प्रभाग ०५ –  शत्रुघ्न अंबाजी काकडे, मिनल विजय पाटील 

प्रभाग ०६ – उषा अजित अडसुळे, नरेश गणपत ठाकूर, सोनल कीर्ती नवघरे, समीर चंद्रकांत कदम 

प्रभाग ०७ – अमर अरुण पाटील, प्रमिला रविनाथ पाटील, मनाली अमर ठाकूर, राजेंद्रकुमार शर्मा 

प्रभाग ०८- बबन नामदेव मुकादम, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरक, रामदास वामन शेवाळे 

प्रभाग ०९- महादेव जोमा मधे, प्रतिभा सुभाष भोईर, दमयंती निलेश भोईर, शशिकांत शनिवार शेळके 

प्रभाग १० – रविंद्र अनंत भगत, सरस्वती नरेश काथारा, मोनिका प्रकाश महानवर, विजय मनोहर खानावकर 

प्रभाग ११- प्रदीप गजानन भगत, हॅप्पी सिंग 

प्रभाग १२- कुसुम रवींद्र म्हात्रे, दिलीप बाळाराम पाटील 

प्रभाग १३-  हेमलता गोवारी, शिला भाऊ भगत, विकास नारायण घरत, रविंद्र गणपत जोशी 

प्रभाग १५- एकनाथ रामदास गायकवाड, सीता सदानंद पाटील, कुसुम गणेश पाटील, दशरथ बाळू म्हात्रे 

प्रभाग १६- राजेश्री महेंद्र वावेकर, कविता किशोर चौतमोल, समीर बाळशेठ ठाकूर, संतोष गुन्डाप्पा शेट्टी 

प्रभाग १७- प्रकाश चंदर बिनेदार, अस्मिता जगदीश घरत, शिवानी सुनिल घरत, मनोज भुजबळ 

प्रभाग १८ – प्रिती जॉन्सन जॉर्ज 

प्रभाग १९ –  सुमित उल्हास झुंझारराव, चंद्रकांत (राजू ) सोनी 

प्रभाग २० – श्वेता सुनिल बहिरा 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.