Press "Enter" to skip to content

मंत्रालयात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची पालकमंत्र्यांची ग्वाही 

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या लेखी आश्वासनांनंतर पालीतील ग्रामीण रुग्णालयासाठी महेश पोंगडे महाराजांनी पुकारलेले धरणे आंदोलन स्थगित…!

सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या  पालीमध्ये प्रलंबित व अत्यावश्यक असलेले सुसज्ज ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर उभारण्यात यावे यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष ह.भ. प महेश पोंगडे महाराज शनिवारी (दि.15) स्वातंत्र्यदिनी भरपावसात धरणे आंदोलनास बसले होते. दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या लेखी आश्वासनांनंतर पोंगडे महाराज यांनी आपले जनआंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. 

सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील कष्टकरी, श्रमजीवी, मजूर व आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वसोईसुविधा पूर्ण अद्ययावत रुग्णालय असणे गरजेचे आहे. गोरगरीब सर्वसामान्य जनतेला खाजगी महागडे उपचार परवडणारे नाहीत.

तालुक्यातील एखादा गंभीर रुग्ण अथवा गर्भवती महिलेवर जलद व योग्य उपचार मिळावे अशी परिस्थिती येथे नाही. शिवाय तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अथवा मुंबईला हलवले जाते. अशा वेळी अनेक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना दुर्दैवी प्राण गमवावे लागले असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पालीत ग्रामीण रुग्णालय निर्माण  होण्याच्या दृष्टीने अनेकदा विविध पक्षाने  नारळ फुटलेत, मात्र पुन्हा त्या भूमीपूजनाच्या पाट्यांकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. त्यामुळे समाजसेवक पोंगडे महाराज यांनी संविधानिक मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेतला. तर या आंदोलनाला मराठा समाज सुधागड तालुका, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान,  महापरिवर्तन वादी पत्रकार संघ,  सुधागड तालुका आदीवासी समाज, मिनिडोर रिक्षा चालक मालक व टेम्पो चालक-मालक संघटना, सम्यक क्रांती विचारमचं, अखिल भारतीय समता परिषद आदी संघटनांनी लेखी पाठींबा दिला. अनेक मान्यवरांनी भेट दिली. तसेच समग्र सुधागड तालुक्यातील जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठींबा दर्शविला. 

     याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुरेशशेठ खैरे यांनी यशस्वी मध्यस्थी करत पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याशी याबाबत फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले की ग्रामीण रुग्णालय उभारण्यासंदर्भात दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे त्यांच्या दालनात संबधीत अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजीत करून ग्रामीण रुग्णालय संदर्भातील बाबी पूर्ण करण्यासंदर्भात आश्वासन दिले. तसेच या बैठकीस आंदोलनातील 2 प्रतिनिधींना चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी यासंदर्भातील लेखी पत्र महेश पोंगडे महाराज यांना दिली. 

   या जनआंदोलनावेळी यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (दिल्ली संलग्न) कोकण संघटक रमेश पवार, तुकाराम ठोंबरे, भगवान दळवी, उमेश जाधव, शरद गोळे, कैलास जाधव, शैलेश जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.