Press "Enter" to skip to content

उरणमध्ये ३१ पॉझिटीव्ह, तर १८ जणांना घरी सोडण्यात आले


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३१ जण सापडले आहेत. तर १८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह ११४८, उपचार करून बरे झालेले ८९४, उपचार घेणारे २०५, मयत ४९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज गोवठणे १, नागाव ३, ओमकार कॉलनी ४, डोंगरी १, नागाव १, केगाव बंधीलवाडी ३, रानवड केगाव १, मुळेखंड १, द्रोणागिरी १, एकटघर जासई १, ग्रँडवेल कॉलनी १, धुतुम १, डाऊर नगर १, चारफाटा गौरीनंदन अपार्टमेंट १, रांजणपाडा जासई १, जेएनपीटी २, काठेआळी केगाव १, कोळीवाडा उरण १, पाटील आळी बोरी २, मोरा उरण १, कोळीवाडा १, बोरखार १ असे एकूण ३१ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर धाकटी जुई १, दिघोडे १, रांजणपाडा १, जासई १, मोरा रोड १, चिरले १, बालई १, नाईक नगर म्हातवली १, बोकडविरा २, कोप्रोली १, नेव्ही नगर करंजा १, कुंभारवाडा १, कोटनाका २, धुतुम १, विमला तलाव उरण १, जेएनपीटी १ असे एकूण १८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
आज १५ ऑगस्ट स्वतंत्र दिन साजरा होत असतानाच उरणमध्ये पॉझिटीव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. आता तर ८ दिवसांवर गणेशोत्सवाचे आगमन होणार आहे. त्याच्या खरेदी निमित्त बाजारपेठेत लोकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉझिटीव्हचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. यासाठी शासनाने व जनतेने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.