Press "Enter" to skip to content

कासवाला पुन्हा सोडले नैसर्गिक अधिवासात

श्रीवर्धन येथील बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

रायगड : याकूब सय्यद

मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर एक मोठं कासव वाहून आले आहे असा तिथे काम करणाऱ्या आकाश सुरेश पाडलेकर रा.वेळास यांनी वनविभाग कांदळवन कक्ष दक्षिण कोकण यांचे कार्यालयास संपर्क केला असता कांदळवन विभाग दक्षिण कोकण यांचे अधिनस्त वनरक्षक, कासव तज्ञ, कासव मित्र यांनी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी जाऊन पाहिले असता ते ग्रीन सीटर्टल (Green Sea Turtle) या प्रजातीचे नरकासव आहे.

रायगड जिल्हयात सागरी क्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात त्या अनुषंगाने या प्रजातीचा त्यात समावेश आहे परंतु आज मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे प्रथमच नर ग्रीन सी कासव वाहून आल्याचे कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांच्यानिदर्शनास आले. अंदाजे 200 किलो वजनाचे हे ग्रीन सीटर्टल त्याची लांबी (डोकंतेशेपटी ) 190 सेंमी, (6 फूट 3 इंच ) पाठीची लांबी 65 सेंमी, (2.11 फुट ) रुंदी 62.5सेंमी, (2 फुट) शेपटी 36 सेंमी आहे.
पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर वाहून आले असावे हे लक्षात आले. वन कर्मचारी यांनी कासवाची तपासणी केली असता, त्याला कुठेही दुखापत झाल्याचे आढळुन आले नाही. मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर व हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर कासव मित्र आणि कांदळवन विभागाचे अधिनस्त वनरक्षक तुषार बाप्पासाहेब भटे व ऋषिकेश विश्वास लव्हटे तसेच कासव तज्ञ मोहन उपाध्ये तसेच तेथील काही स्थानिक ग्रामस्थ आणि फेरी बोटीवर काम करणाऱ्या मुलांच्या यांचे साहाय्याने त्या कासवाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

अशा प्रकारचे नर ग्रीनसीटर्टल (Green Sea Turtle) कासव पहिल्यांदाच रायगड जिल्हयातील किनारपट्टीला लागल्याचे कळले आहे. यापूर्वी आसपासच्या किनाऱ्यावर किंवा खाडीत ग्रीन सीटर्टलच्या माद्या आढळल्या आहेत परंतु नर कासव सापडले अथवा आढळले अशी ही पहिलीच घटना रायगड जिह्यातील मौजे बागमांडला, श्रीवर्धन मधली आहे. अशाप्रकारे समुद्री कासव आढळल्यास त्वरीत कांदळवन विभागास कळविण्यात यावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकण श्रीमती कांचन पवार यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.